Public Finance Flashcards
लोक येखा समिती केंव्हा स्थापित झाली ?
19 21
Export > Import असलेले दोन वर्ष ?
1972-73
1976-77
अविकासात्मक ( Non - development ) खर्च ?
१ ) युद्धसामग्री खरेदी करण्यासाठी केलेला खर्च
२ ) व्याज देण्यासाठी केलेला खर्च
अर्थसंकल्पिय तूट शून्य दाखवली जाते — पासून .
1996-97
तू ट =
खर्च - जमा
परिणामी महसुली तूट = महसुली तूट - ?
अनुदाने
1985 नंतर अर्थसंकल्पात भांडवली अधिक्याची कारणे ?
१ ) सार्वजनिक उद्योग उभारणीवरील खर्च थांबविणे
२ ) अधिकाधिक कर्ज घेणे .
वार्षिक वित्तिय विवरणात न दाखवली जाणारी तूट ?
भांडवली तूट
राजकोषातील खड्डा म्हणजे ?
राजकोषीय तूट
चलनविषयक तूट = ?
RBI कडून केलेली उचल ( sarplus ) किंवा कर्ज ( debt )
प्राथमिक तूट = राजकोषिय तूट - ?
व्याज
तेजी मंदीच्या काळात येणारी तूट / अधिक्य ?
चक्रीय तूट / अधिक्य
अशी तूट जी प्रत्येक शासकीय जमाखर्चात असतेच ?
रचनात्मक तूट ( structural deficit )
अर्थव्यवस्था जेव्हा सूप्त किंवा स्थिर उत्पादनाच्या पातळीला कार्य करते तेव्हा अर्थसंकल्पीय तूट कोणती असते ?
तेव्हा अर्थसंकल्पीय तूट ही रचनात्मक तूटी इतकी असते .
अर्थसंकल्पीय दस्ताऐवजात किती प्रकारचे दस्तऐवज असतात ?
वार्षिक वित्तीय विवरणासह सोळा प्रकारचे दस्तऐवज असतात
16 प्रकारच्या अर्थसंकल्पीय दस्तावेज यांपैकी किती घटनात्मक दस्तावेज असतात ?
5
अर्थसंकल्पीय दस्तावेजंपैकी घटनात्मक दस्ताऐवज / विधेयके ?
१ )वार्षिक वित्तीय विवरण २ ) अनुदान मागणी 3) विस्तृत अनुदान मागण्या ४ ) विनियोजन विधेयक ५ ) वित्त विधेयक
एफ आर बी एम Act नुसार ची विवरणपत्रे ?
१)राजकोषीय धोरणाचे विवरणपत्र (FPSS- Fiscal policy strategy statement)
२)मध्यवर्ती राजकोषीय धोरणाचे विवरणपत्र (MTFPS- MEDIUM TERM FISCAL POLICY STATEMENT)
३)बृहलक्षी आराखड्याचे विवरणपत्र(MFS- macroeconomic framework statement)
४)मध्यावधी खर्चाच्या आराखड्याचे विवरणपत्र(MTEFS- medium term expenditure framework statement)
FRBM Act नुसार ची अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली जाणारी विवरण पत्रे ?
FPSS, MTFPS, MFS and MTEFS
या चार पैकी पहिले तीनच विवरणपत्रे अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली जातात तर चौथे विवरणपत्र पुढील संसदीय अधिवेशनात मांडले जाते
वार्षिक वित्तीय विवरणात असणारी विवरणे कोणती ?
१) भारताचा संचित निधी -जमा व खर्च
१ अ ) भारताच्या संचित निधी मधील प्रभारीत खर्च
३) आकस्मिक निधी -जमा व खर्च
४) लोकलेखा निधी -जमा व खर्च
रेल्वेची हिशेब खाते केंद्रीय खात्यापासून वेगळे , केव्हापासून ?
१९२४ पासून
रेल्वे हिशेब वेगळे करण्याचे कारण
केंद्रीय हिशेबात एकट्या रेल्वेचा हिशेब 70 ते 80 टक्के असल्यामुळे
कर्जापोटी रेल्वे दरवर्षी केंद्राला किती रुपये लाभांश व व्याज देत असे ?
दहा हजार कोटी
……… साल च्या अहवालातून स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प बाद करण्याची शिफारस …….. ( रेलवे मंत्रालय स्थापित )ने केली होती
जून 2015
विवेक देबरॉय समिती
विवेक देबरॉय व किशोर देसाई यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेल्या ………. लेखातून स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प बाद करण्याची शिफारस केली
Dispensing with the railway budget
स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प बाद झाल्यामुळे काय झाले आहे ?
१)रेल्वे जमा आणि खर्चाचा हिशेब रेल्वे मंत्रालयाकडेच
२) केंद्राने रेल्वे मंत्रालयाला दिलेली मदत ही आता केंद्राचा खर्च असून रेल्वे वरील कर्ज नाही
३) रेल्वे कमावलेले भाड्यासारखी व्यवसायिक उत्पन्न हे रेल्वे कडेच राहते. ते केंद्राच्या करेतर महसुलात दिसत नाही.
४) केंद्राच्या वार्षिक वित्तीय विभागातील आकडे यामुळे बदलले नाही
एल के झा समिती
1984
वित्तीय वर्षाच्या ( Financial Year ) प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी
अर्थसंकल्पीय अंदाज बांधण्याचे काम केव्हा सुरू होते
मागील वर्षाच्या ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यापासून
विविध खात्याचे अर्थसंकल्प ……….. महिन्यात वित्त मंत्रालयात येतात
नोव्हेंबर
अर्थसंकल्पीय भाषणाच्या पहिल्या भागात काय असते
अर्थव्यवस्थेचे 👉 सामान्य आर्थिक लक्ष
अर्थसंकल्पीय भाषणाच्या दुसऱ्या भागात काय असते
शासनाची 👉आर्थिक स्थिती आणि 👉कर प्रस्ताव यांची माहिती
वार्षिक वित्तीय विधेयक (Finance Bill) ते मांडल्यापासून किती दिवसांच्या आत संसदेने संमत करून राष्ट्रपतीची संमती मिळवणे आवश्यक आहे
75 दिवसात
मंत्रिमंडळाला अंतिम सारांश अर्थसंकल्प सादर करण्याच्या किती वेळ आधी दाखविला जातो
10 मिनिटे आधी
देशाच्या अर्थव्यवस्थेची विश्लेषण कशात केलेले असते
आर्थिक पाहणी अहवालामध्ये
आगामी वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करताना स्त्रोतांचे उपलब्धीकरण, वापर आणि साध्य यांचे सादरीकरण करणारा अहवाल जो अर्थव्यवस्थेचे चित्र प्रदर्शित करत असतो तो कोणता ?
आर्थिक पाहणी अहवाल
अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने आणि उपाय सुचविणारा अहवाल कोणता
आर्थिक पाहणी अहवाल
वित्तमंत्री संसदेत वार्षिक वित्तीय विवरण कोणत्या कलमानुसार मांडतात ?
कलम 112 नुसार
वित्तमंत्री संसदेत वित्त विधेयक कोणत्या कलमानुसार मांडतात ?
कलम 117 नुसार
लेखानुदान ( Vote On Account ) केव्हा व कोणत्या कलमानुसार मांडले जात असे ?
अर्थसंकल्प मांडल्यानंतर चार ते पाच दिवस साधारण चर्चा झाली की 116 व्या कलमानुसार
…………. मुळे करविषयक सुधारणा एक जून पासूनच लागू केल्या जायच्या
लेखानुदाणामुळे
साधारण चर्चेबद्दल काही
१)दुसऱ्या दिवसापासून चार ते पाच दिवस अर्थसंकल्पावर साधारण चर्चा केली जाते
२) चर्चा फक्त धोरणात्मक असते
३) कुठलाही कर प्रस्ताव मांडला जात नाही किंवा कुठलेही मतदान घेतले जात नाही
कलम ……… नुसार अनुदान मागणीची( Demand for Grants) विधेयक मांडले जाते
113
अनुदानाच्या मागण्या जेव्हा विविध संसदीय समित्यांकडे चर्चेसाठी पाठविल्या जातात तेव्हा………. चर्चा सुरू होते .
विशेष चर्चा ( special discussion )
…………वरील चर्चा सुरू झाली की संसदेचा कोणताही सदस्य कपात प्रस्ताव मांडू शकतो
अनुदानाच्या मागणी
धोरणात्मक कपातीतील प्रस्ताव कोणता ?
अनुदान मागणीत 👉एक रुपयापर्यंत कपात करावी
धोरणात्मक कपात मांडण्याचा खरा उद्देश काय ?
शासनाच्या धोरणाला नापसंती दर्शविणे
कोणत्या कपातीसाठी विरोधी सदस्य एखादी पर्यायी धोरण सुचवू शकतो ?
धोरणात्मक कपातीसाठी
काटकसर कपातीत कोणता प्रस्ताव मांडला जातो
अनुदान मागणीत 👉विशिष्ट रकमेची कपात करावी
प्रतीकात्मक कपाती मध्ये कोणता प्रस्ताव मांडला जातो
अनुदान मागणीत शंभर रुपयांची कपात करावी
प्रतिकात्मक कपातीचे उद्देश काय
शासनाच्या विशिष्ट खर्चाकडे संसदेचे लक्ष खेचण्यासाठी
कपात प्रस्ताव कोणाकडे पाठविले जातात
कपात प्रस्ताव संसदेच्या 👉वित्तीय सल्लागाराकडे ( Financial Advisory ) पाठविले जातात
कपात प्रस्ताव व वित्तीय सल्लागार
वित्तीय सल्लागार निवडक कपात प्रस्तावच ग्राह्य धरतो व त्यावर विविध नोंदी टाकून ते प्रस्ताव संबंधित मंत्रालयाकडे पाठवीतो
अनुदान मागणी वरील मुदत कोण ठरून देते ?
व्यवसाय सल्लागार समिती
कपात प्रस्तावाबद्दल काही
अनुदान मागण्या संसदीय मतदानाने मंजूर करून घेण्याअगोदर मागण्याची संबंधित एकेक कपात प्रस्ताव संसदेत मांडले जाते .
त्यावर संसदेत मतदान घेतले जाते आणि एक एक कपात प्रस्ताव बा द केले जातात व सर्व कपात प्रस्ताव बाद केल्यानंतर अनुदान मागण्या संसदीय मतदानाने मंजूर करून घेतल्या जातात .
एखादा कपात प्रस्ताव मंजूर झाला किंवा अर्थसंकल्प नामंजूर झाला तर ?
सरकारला पायउतार व्हावे लागते
कारण
कपात प्रस्ताव मंजूर होणे हे 👉अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यासारखेच असते
विनियोजन विधेयक केव्हा व कोणत्या कलमानुसार व कोठे मांडले जाते
सर्व अनुदान मागण्या मंजूर झाल्यानंतर कलम 114 नुसार विनियोजन विधेयक लोकसभेत मांडले जाते
विनियोजन विधेयक संमत झाल्यामुळे सरकारला कोणता अधिकार प्राप्त होतो ?
संचित निधीतून पैसे काढण्याचा
विनियोजन विधेयक मांडणे, चर्चा करणे व संमत करणे या बाबी एकाच दिवशी करण्यासाठी कोणाची पूर्वसंमती घ्यावी लागते ?
सभापतींची
वित्त विधेयक लोकसभेत………. दिवशी ………. कलमानुसार मांडले जाते .
अर्थसंकल्पाच्या दिवशी
117
………….विधेयक संमत झाल्यानंतर ‘वित्त विधेयकावर’ चर्चा सुरू होते.
विनियोजन विधेयक
संमती द्यावयाच्या किती दिवस आधी वित्त विधेयकाच्या प्रती संसदेच्या सदस्यांमध्ये वितरित केल्या जातात ?
वित्त विधेयक हे 👉अर्थसंकल्प मांडलेल्या दिवशीच सादर केलाला असतो मात्र तो सुरक्षित राखून ठेवलेला असतो व संमती द्यावयाच्या दिवसाच्या 👉2 दिवस आधी त्याच्या प्रति संसदेच्या सदस्यांमध्ये वितरित केल्या जातात
वित्त विधेयक केव्हा संमत करावे लागते
वित्त विधेयक संसदेत मांडल्यापासून /अर्थसंकल्प मांडल्या दिवसापासून / 1 फेब्रुवारीपासून 75 दिवसांच्या आत संमत करावे लागते
लोकसभेच्या निवडणुकांचे वर्ष असल्यास आधी मावळत्या सरकारकडून कोणता तर नव्या सरकारकडून कोणता अर्थसंकल्प सादर केला जातो ?
आधी मावळत्या सरकारकडून मध्यावधी अर्थसंकल्प तर नव्या सरकारकडून साधारण अर्थसंकल्प सादर केला जातो
मध्यावधी अर्थसंकल्प कोणत्या कलमानुसार सादर केला जातो
कलम 112 नुसारच
लेखा अनुदानात फक्त अर्थसंकल्पीय …………….. अंतर्भाव असतो
खर्चाचा
मध्यावधी अर्थसंकल्प कोण मांडते
फक्त मावळते सरकार
विनियोजन विधेयका नुसार 👉मंजूर नसलेला परंतु नंतर उद्भवलेला एखादा खर्च भागवण्यासाठी ……….अनुदान …… कलमानुसार मांडले जाते.
पूरक अनुदान
(supplementary demand for grants)
115
मंजूर अनुदानाच्या मागणीपेक्षा जास्त खर्च येणार असल्यास…….. अनुदान …… कलमानुसार संमत करून घ्यावे लागते
वाढीव अनुदान
(additional demand for grants)
115 नुसारच
(जास्त खर्च - Additional demand )
शंकर आचार्य समिती स्थापन होण्याआधी जुलै 2016 मध्ये Need for changing India’s financial year -Discussion note हा अहवाल कोणी प्रकाशित केला ?
निती आयोगाचे 👉पूर्ण वेळ सदस्य 👉विवेक देवराय आणि निती आयोगाची एक विशेष नियुक्त अधिकारी 👉किशोर देसाई यांनी 👉संयुक्तपणे
जानेवारी ते डिसेंबर यावर भर दिला
आंतरराष्ट्रीय संस्था जसे संयुक्त राष्ट्र संघ संयुक्त राष्ट्र संघाचे सांख्यिकी कार्यालय आणि किती बहुराष्ट्रीय कंपन्या कोणता आर्थिक वर्ष मानतात
जानेवारी ते डिसेंबर
इंग्लंडमधील आर्थिक वर्ष
एप्रिल ते मार्च
ईशान्य मोसमी पाऊस ………… महिन्या दरम्यान पडतो
ऑक्टोबर ते डिसेंबर
जास्तीचा खर्च भागविणे याला काय म्हणतात
तुटीचा अर्थभरणा करणे असे म्हणतात
कोणत्या शास्त्रज्ञाने तुटीचा अर्थसंकल्प सादर करणारे राजकोषीय धोरण राबवण्याचा सल्ला दिला व त्याचे उद्देश काय होते
केन्स ,आर्थिक मंदी दूर करण्यासाठी
कायदा यंत्रणेला पूरक ठरणारा आर्थिक वर्ष कोणता
जानेवारी ते डिसेंबर