राष्ट्रीय उतपन्न Flashcards
United Nations- System of National Accounts ही पद्धत कोणी सुचवली
रिचर्ड स्टोन
- या का माबद्दल 1984 चे नोबेल
पध्दत U N ने 1953 मध्ये प्रकाशित केले
- SNA तयार करण्या मागचा उद्देश - “आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्थव्यवस्थांची तुलना करता यावी यासाठी राष्ट्रीय लेख्यांची रचना समान असावी “ असा होता
भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न कोणी केला
दादाभाई नवरोजी ( 1867-68 )
“पॉवर्टी आणि ब्रिटिश रुल इन इंडिया “ या पुस्तकात त्याचे विवेचन
- देशातील तोडके उत्पन्न देखील इंग्लंडकडे कसे वळत आहे ? यावर त्यांनी लक्ष वेधले
- इंग्रजांच्या या पिळवणूकीला त्यांनी संपत्तीचा निचरा किंवा धण निस्सारण ( Drain of Wealth ) असे म्हटले
राष्ट्रीय उत्पन्न मोजताना जे नमुने गोळा केले जातात त्यांची पद्धत विकसित करण्यासाठी युनायटेड नेशनने एक समिती स्थापन केली ( 1947 - 48 )त्याचे अध्यक्ष कोण ?
पीसी महालनोबिस
1949 मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे जबाबदारी भारत सरकारने कोणावर टाकली
*पीसी महालनोबिस
- राष्ट्रीय उत्पन्न समिती ( 1949 )
प्रमुख- पीसी महालनोबिस
सदस्य - गाडगीळ व VKRV राव
भारताचे दरडोई उत्पन्न
१)दादाभाई नौरोजी ( 1967 - 68 ) = २० रुपये
२) फिन्डले शिरास ( 1911 ) = 49 रुपये
३) वाडिया आणि जोशी (1913-14 ) = 44.30 रु
डॉ . व्ही के आर व्ही राव
- उत्पन्न काढण्यासाठी यांनी सर्वप्रथम शास्त्रीय पद्धतीचा वापर केला
-यांनी उत्पादनाची गणना (Census of Output) आणि उत्पन्नाची गणना ( Census of Income) या दोन्ही पद्धतींचा संयुक्तिक वापर केला - दरडोई उत्पन्न
१) 1925-1929 = 76 रु
२)1931-32 = 62 रु
राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या पहिल्या अहवालानुसार आकडे ( 1951 )
भारताचे राष्ट्रीय उत्पन्न - 8 ,710 कोटी
दरडोई उत्पन्न 255 रुपये
राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या अंतिम अहवालातील आकडे (1954)
भारताचे राष्ट्रीय उत्पन्न - 8,650 कोटी
दरडोई उत्पन्न 246.90 रुपये
हे आकडे स्वीकारण्यात आले
राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय
1 )राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत संस्थांनी कमावलेले उत्पन्न होय👉 उत्पन्न पद्धत
2 ) राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य होय👉 उत्पादन पद्धत
3 )राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत कुटुंब संस्थांनी उद्योग संस्थांनी व सरकारने केलेला खर्च आणि निव्वळ निर्यात मूल्य होय 👉खर्च पद्धत
राष्ट्रीय उत्पन्न समितीने उत्पन्नाच्या कोणत्या पद्धतींचा अवलंब करण्यास सुचविले ?
उत्पादन व उत्पन्न
खर्च पद्धत नव्हे
उत्पाद (Product) सबसिडी ?
१)अन्न सबसिडी
२) खत सबसिडी
३) इंधन सबसिडी
४) शेतकऱ्यांना व विशिष्ट लाभार्थ्यांना दिली जाणारी व्याज सबसिडी
५) विशिष्ट लाभार्थ्यांना विमा सेवा पुरविण्यासाठी दिली जाणारी सबसिडी
आकारमान विचारात घेऊन प्रति एकक सबसिडी दिली जाते
उत्पाद ( Product ) कर ?
आकारमान विचारात घेऊन प्रति एकक आकारला जातो
१)उत्पादन शुल्क २) विक्रीकर ३) सेवा कर ४) सीमा शुल्क ५) उत्पाद GST
उत्पादन ( Prodution )सबसिडी ?
१)रेल्वेला दिली जाणारी सबसिडी
२) कृषी आधार सबसिडी
३) खेड्यांना व लघु उद्योगांना दिली जाणारी सबसिडी
४) महामंडळ व सहकारी संस्थांना दिले जाणारे प्रशासकीय सबसिडी
उत्पादनाचे आकारमान विचारात न घेता सबसिडी दिली जाते
उत्पादन ( Prodution ) कर -?
१)जमीन महसूल २) स्टॅम्प शुल्क ३) नोंदणी शुल्क ४) व्यावसायिक कर ५) उत्पादन GST
उत्पादनाचे आकारमान विचारात न घेता कर आकारले जाते
प्राथमिक ते पंचम क्षेत्र
क्षेत्र - आधारित क्रिया \: - १)प्राथमिक क्षेत्र - स्रोत २)द्वितीय क्षेत्र - उत्पादन ३) तृतीय क्षेत्र - सेवा ४) चतुर्थक क्षेत्र - ज्ञान ५) पंचम क्षेत्र - बौद्धिक संपदा
प्राथमिक क्षेत्र
कृषी वने व मासेमारी
द्वितीय क्षेत्र
१) खानकाम व उत्खनन
२) वीज वायू पाणीपुरवठा व इतर
३) बांधकाम
तृतीयक क्षेत्र
१)व्यापार , हॉटेल , वाहतूक , दळणवळण व प्रक्षेपण संबंधित (Broadcasting) सेवा
२) वित्तीय , रियल इस्टेट आणि व्यावसायिक सेवा
३) लोकप्रशासन संरक्षण व इतर सेवा
चतुर्थक क्षेत्र
माहिती व्यवस्थापन information management मार्गदर्शन consultancy संख्याशास्त्र statistics संशोधन research विकास development माहिती information तंत्रज्ञान technology
पंचम क्षेत्र
नवीन कल्पना , नवीन तंत्रज्ञान , नवीन शोध या शास्त्रज्ञांनी आणि उच्च व्यावसायिकांनी दिलेल्या सेवा
क्रयशक्ती आधारित विनिमय दर काढायचा असेल तर
दोन देशांमधील वस्तू व सेवांच्या टोपलीच्या ( basket of goods and services) किमतीची तुलना करतात
शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पादन ( NNPs- Sustainable Net National Product)
NNPs = GNP - Dm -Dn
Dm - भांडवली संपत्तीचा घसरा
Dn- पर्यावरणाचा घसरा
GNH -GROSS NATIONAL HAPPINESS
ही संकल्पना कोणी सुचवली
भुतानचे चौथी राजे जिग्मे सिंगे वांगचुक 1972 मध्ये
सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय
Ministry of statistics and program implementation
-सांख्यिकी विभाग आणि कार्यक्रम कार्यान्वयन विभागाच्या एकत्रिकरणातून 1999 ला अस्तित्वात आले
-दोन विभाग
१) सांख्यिकी विभाग
२) कार्यक्रम कार्यान्वयन विभाग
- अन्य कार्यरत संस्था
१) राष्ट्रीय सांख्यिकी आयोग
२) भारतीय सांख्यिकी संस्था
सांख्यिकी विभाग
-सांख्यिकी विभागाला राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO- NATIONAL STATISTICAL OFFICE) म्हणून संबोधले जाते
- दोन उपविभाग
१) CSO - Central Statistical Office
२) NSSO - National Sample Survey Office
कार्यक्रम कार्यान्वयन विभाग
- 3 उपविभाग
१) TPP- Twenty Point Program
२) IMPM- infrastructure monitoring and project monitoring
३)MPLADS- member of parliament local area development scheme
CSO
स्थापना -1951
मुख्यालय -नवी दिल्ली
cso अंतर्गत
- संगणक केंद्र - न . दिल्ली
- औद्योगिक सांख्यिकी केंद्र - कोलकाता
CSO ची कार्ये
१)राष्ट्रीय लेखी तयार करणे
२) राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे काम सीएसओ करत असते
३) वार्षिक औद्योगिक पाहणी तसेच आर्थिक गणना करणे
४) IIP - Index of Industrial Production मोजणे
५) CPI - Consumer Price Index मोजणे
NSSO
स्थापना - 1950
पुनर्रचना - 1970
NSSO कोणाच्या निर्देशाने काम करते
राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या निर्देशाने
राष्ट्रीय सांख्यिकी आयोग
2000 मधील डॉ सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाच्या शिफारशीनुसार 👉2006 ला पहिल्या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना करण्यात आली
व्यापार चक्राचा क्रम
मंदी –> पुनरुत्थान –> तेजी –> घसरण –> पुन्हा मंदी
अर्थव्यवस्थेच्या तेजीचे प्रमुख लक्षण
GDP मध्ये तीव्र वृद्धी
कोणती महागाई तेजीला पूरक ठरते
चालणारी महागाई (walking inflation )
चालणारी चलनवाढ / महागाई
तीव्र मागणीमुळे तेज येथील अर्थव्यवस्थेत चलनवाढ आढळते परंतु मागणीच्या तुलनेत उत्पादन वाढवून पुरेसा पुरवठा होत राहिल्यामुळे महागाई आटोक्यात देखील राहते यालाच चालणारी महागाई ( walking Inflation )असे म्हणतात
घसरण किंवा प्रतिसरण ( Recession )
सलग दोन तिमाही (6 महिने )पेक्षा जास्त कालावधीसाठी जीडीपी मध्ये मध्यम स्वरूपाची घट येत असेल आणि चलन घट होत असेल तर त्या अवस्थेला घसरण किंवा प्रतिसरण असे म्हणतात
घसरण अवस्था कशी असते व
परिणाम काय असतात ?
ताब्यात ठेवण्याजोगी ( manageable )असते . राजकोषीय तथा चलनविषयक उपाय योजना घसरण अवस्थेतून अर्थव्यवस्थेला बाहेर काढता येऊ शकते
- उत्पादन घटते
- अल्पकालीन ( acute ) बेरोजगारी निर्माण होते
- व्याजदर कमी होतात तथा कमी करावे लागतात
- सरकार वरील कर्ज वाढते
- परकीय खात्यावर तूट निर्माण होते आणि चलनाचे मूल्य घसरते
- सततच्या घसरणीचे पर्यवसान मंदीत होऊ शकते .
मंदी
- GDPवृद्धि दरात लक्षणीय व दीर्घकालीन घट
- तीव्रचलन घट किंवा बेसुमार चलनवाढ
वारंवारता -दीर्घकाळानंतर .
-साधारणतः पाच ते सात वर्षानंतर
-काही दशकानंतर -👉महामंदीचे ( Great
Depression )चक्र येते - जसे 1929
उपाय
- उपाय निष्क्रिय होतात
- ताब्यात राहत नाही ( unmangeable )
परिणाम
- उत्पादन थांबते
- तीव्र बेरोजगारी निर्माण होते
- व्याजदर शून्याचाही खाली जातो
- सरकार कर्जबाजारी होते
- आयात वाढते निर्यात घडते
- चलनाचे मूल्य तीव्र घसरते
V - shaped recovery
-ज्या गतीने अर्थव्यवस्था मंदीत शिरली त्याच गतीने तिचे पुनरुत्थान होत असेल तर
- ## लॉक डाऊन केल्याने अर्थव्यवस्था मंदीत शिरणे आणि लॉक डाऊन काढून टाकल्यामुळे अर्थव्यवस्था लगेच पुरवण्यात होणे त्यामुळे जगातील बहुतांशी देशांनी V प्रकारचे पुनरुत्थान अनुभवले
W -shaped recovery
- मंदीनंतर लगेच पुनरुत्थान आणि पुन्हा मंदी आणि पुन्हा लगेच पुनरुत्थान यामुळे W आलेख तयार होतो
- covid-19 ची दुसरी लाट अनुभवलेल्या देशांमध्ये असे आलेख पहावयास मिळत आहेत
U -shaped recovery
- अर्थव्यवस्था मंदीत शिरणे ही मंदी काही वर्षांसाठी तसेच राहणे आणि नंतर तिचे पुनरुत्थान होणे
- अमेरिका आणि युरोपमधील 2008 ते 2011 कालावधीतील मंदी या प्रकारची होती
✓ -shaped recovery
- अर्थव्यवस्था मंदीत फिरते तिची पुनरुतन देखील होते परंतु ते V आलेखासारखे लगेच नव्हता संत व निरंतर होत राहते
- कोविड-19 नंतर 👉 ‘लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उघडणे ‘ यामुळे हा आलेख निर्माण होऊ शकतो
L -shaped recovery
- अर्थव्यवस्था मंदीत शिरणे आणि ही मंदी बरीच वर्षे तसेच टिकून राहणे
- मंदिर उपाय न करणे , मंदीवरील उपाय निष्प्रभ होणे , उत्पादन यंत्रणा गंभीरपणे बाधित होणे , कोविड-19 सारख्या संकटावर नियंत्रण मिळताना येणे यामुळे हा आलेख निर्माण होऊ शकतो
भारतातील चक्र - पुनरुत्थान ?
भारतात V - shaped Recovery आढळली असली तरी W - shaped Recovery ची शक्यता दाट आहे .