आर्थिक नियोजन Flashcards
शेती क्षेत्रासाठी च्या आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे
१)शेती उत्पादनात वाढ करणे
२) ग्रामीण भागातील 👉उत्पन्नातील विषमता कमी करणे
३) सर्व गावांना👉 वीज उपलब्ध करून देणे
४) 👉रोजगारात वाढ करणे
५) सिंचन क्षेत्राचे प्रमाण वाढविणे
६) अन्नधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवणे
Niti Aayog?
घोषणा : 15 ऑगस्ट 2014 ( चीनच्या NDRC च्या धर्तीवर )
स्थापना : 1 जानेवारी 2015
Narendra Modi, Chairperson
Suman Bery, Vice Chairperson
Parameswaran Iyer, CEO
निती आयोग कशाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आला ?
👉चीनमधील 👉’ राष्ट्रीय विकास व सुधारणा आयोग ‘ (NDRC- National Development & Reforms Commission ) च्या धर्तीवर स्थापन करण्यात आला
नीती आयोगाबाबत
१)निधी वाटप करण्याचा अधिकार नाही
२) हा एक विचार गट आहे
३) राज्यांवर धोरण लादले जात नसून केवळ सल्ला दिला जातो
४) धोरण आखणी करताना राज्यांशी चर्चा केली जाते
५) केंद्र तसेच राज्य सरकारांना धोरण विषयक बाबींवर व्यूहात्मक व तांत्रिक सल्ला देतो
1950 ते 80 या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर
3.5% व
दरडोई उत्पन्न वाढीचा दर -1.3% [ यालाच👉 ‘हिंदू वृद्धीदर ‘असे म्हणतात (हिनवण्यासाठी ) ]
भारताच्या आर्थिक वृद्धी बाबत काही —
१)आर्थिक नियोजनाच्या काळात राष्ट्रीय उत्पन्नातील कल 👉सातत्यपूर्ण वृद्धी
👉दाखवत नाही
२) नियोजनाच्या एकूण कालावधी पैकी फक्त
👉निम्म्या कालावधीतच👉 वृद्धी झालेली आहे
३) आर्थिक नियोजनाच्या जवळजवळ 👉निम्म्या कालावधीत काहीच वृद्धी झालेली नाही तर
👉ऋणवृद्धी झाली आहे
विश्वेश्वरय्या योजना
- 1934
- औद्योगिकीकरणावर भर दिला
- औद्योगिकीकरण करा किंवा नष्ट व्हा (industrialize or periesh)
- पुस्तक ः The Planned Economy of India
FICCI योजना
- 1934
- federation of Indian chambers of commerce and industry -भारतातील प्रमुख भांडवलदारांची संघटना
- अध्यक्ष - 👉एन.आर. सरकार
- भांडवलदारांचा समावेश असूनही एफ आय सी सी आय ने 👉मुक्त अर्थव्यवस्थेला ( Laissez Faire ) विरोध केला आणि एका 👉 राष्ट्रीय नियोजन आयोगाची गरज बोलून दाखवली
- एफ आय सी सी आय ने ब्रिटिश शासनाला 👉केन्सवादी मार्गाने नियोजन करण्याचा सल्ला दिला
काँग्रेस योजना
- 1938
- हरिपुरा अधिवेशन ( अध्यक्ष - सु. बोस )
- गांधीजीच्या प्रेरणेने राष्ट्रीय नियोजन समितीची 👉( National Planning Committee ) निर्मिती .👉 नेहरू या समितीचे अध्यक्ष
- समितीत 👉15 सदस्य व 👉 29 उप समित्या होत्या
- 1950 मध्ये स्थापन झालेला नियोजन आयोग या समितीवर आधारलेला होता
मुंबई योजना Bombay plan
- 1944
- मुंबईतील आठ उद्योगपतींनी
- 👉’A plan of economic development for India ‘ नावाचा एक कृती आराखडा जाहीर केला
- 👉तीव्र औद्योगिकीकरण ,👉 जमीन सुधारणा , लघुउद्योग ,व्यापार व विकास -बद्दल सकारात्मक दृष्टिकोन
गांधी योजना
- 1944
- 👉नारायण अग्रवाल यांनी
- गांधीवादी विचारसरणीवरून प्रभावित होऊन
- ग्रामीण विकास , कुटीर व लघुउद्योग तसेच कृषी व्यवस्थेवर सर्वाधिक लक्ष
- 👉’आर्थिक विकेंद्रीकरण ‘ हे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये होते
जनता योजना
- 1945
- 👉मानवेंद्रनाथ रॉय यांनी
- 👉जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा देणारे नियोजन असावे
- या योजनेत 👉मार्क्सवादी समाजवाद डोकावत होता
- 👉कृषी व उद्योग दोन्ही क्षेत्रांवर भर देण्यात आला
- ही 👉मुंबई योजनेला 👉प्रत्युत्तर म्हणून होती
सर्वोदय योजना
- 1950
- अहिंसक पद्धतीने 👉शोषण विरहित समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून
- 👉जयप्रकाश नारायण या 👉समाजवादी नेत्याने
- कृषीक्षेत्र , लघु , कुटीर उद्योग , 👉स्वयंपूर्णता , 👉जमीन सुधारणा , 👉आर्थिक विकेंद्रीकरण यावर भर
- 👉महात्मा गांधी व 👉 आचार्य विनोबा भावे यांच्या विसारसरणीवर आधारलेली
आदेशात्मक अर्थव्यवस्था म्हणजे ……… अर्थव्यवस्था.
नियोजित अर्थव्यवस्था
भारत आदेशात्मक नियोजनाकडे अधिक …… पासून झुकला .
- 1956 :- 👉दुसऱ्या औद्योगिक धोरणापासून
- 👉 समाजवादी समाजरचना निर्माण करण्याचे ध्येय ठरवण्यात आले
1956 च्या दुसऱ्या औद्योगिक धोरणापासून भारताने ठरवलेली समाजवादी समाजरचना ही कोणत्या पद्धतीची होती ?
लोकशाही पद्धतीची समाजवादी समाजरचना
- Democratic Socialism
1956 ते 1991 पर्यंत नियोजन हे ……. होते
भौतिक ( physical )
1991 च्या नवीन औद्योगिक धोरणापासून आदेशात्मक ऐवजी …… सुरू झाले
भौतिक नियोजन व सूचकात्मक नियोजनाला …… जोड देण्यात आली
सूचकात्मक नियोजन ( indicative planning )
सामाजिक नियोजनाची ( social planning )
भारतीय बहुस्तरीय नियोजनातील विकसित होत गेलेले पाच स्तर ?
केंद्रीय , राज्य , जिल्हा , तालुका व ग्रामस्तर
1950 मधील नियोजन आयोगाच्या स्थापनेमुळे …………………… , 1952 मधील राष्ट्रीय विकास परिषदेच्या स्थापनेमुळे …………….. तर 1992 - 93 मधील 73 व्या व 74 व्या घटना दुरुस्ती मुळे…………….. नियोजनाला पाठबळ मिळाले .
- केंद्रीय नियोजनाला
- नियोजनात राज्यस्तरीय सहभागाला
- जिल्हा -तालुका - ग्रामस्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावरील नियोजनाला
निती आयोगाच्या माध्यमातून ……………..निर्मितीस सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे
सहकारी संघराज्य व ‘सशक्त राज्य -सशक्त राष्ट्र ‘ निर्मितीस
बोलशील क्रांती नंतर रशियन सरकारने…………….. नंतर पंचवार्षिक योजनांचा कार्यक्रम हाती घेतला
- 1928
- या योजनांना Goss Plan नाव देण्यात आले होते .
भारतीय नियोजन आयोग
- 15 मार्च 1950
- भारत सरकारच्या अध्यादेशान्वये (resolution of Government of India)
- एक घटना बाह्य सल्लागार मंडळ
- रशियन नियोजन योजनांपासून प्रेरणा घेऊन .
- आयोगाचे👉 उपाध्यक्ष दैनंदिन कामकाज पाहत असत
- 1 एप्रिल 1951 ला पंचवार्षिक योजना सुरू .
प्रादेशिक नियोजन ( Regional Planning )
- संपूर्ण राष्ट्र किंवा विशिष्ट राज्य किंवा विशिष्ट जिल्हा लक्ष न ठेवता विशिष्ट प्रदेश लक्ष ठेवून त्याचे सर्वार्थाने नियोजन केले जाते
- प्रादेशिक नियोजन करताना राष्ट्र स्तरावरील अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे याला विशेष महत्त्व उरत नाही
- एका विशिष्ट प्रदेशाला विकासाची स्वायत्तता देऊन स्त्रोत उभारण्याची व विकासासाठी खर्च करण्याची मुभा देण्यात येते
टेनेसी खोरे नियोजन
- 1933 मध्ये TVA - Tenessy Valley Authority - अमेरिका
- प्रादेशिक नियोजनाचे सर्वात पहिले व उत्तम उदाहरण
भारतातील प्रादेशिक नियोजन
- पूर्णपणे स्वायत्त स्वरूपाचे नसते
- केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाने प्रादेशिक योजना राबविल्या जातात
- उदा . नक्षलग्रस्त LWE(Left Wing Extremism) प्रदेशांसाठीच्या विकास योजना
…………हे निती आयोगाचे मार्गदर्शक तत्त्व आहे.
प्रमाणक स्थापक नियोजन (Normative planning)